आमच्या मनात फडणवीसच मुख्यमंत्री – विनायक मेटे

मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रात विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .विनायक मेटेयांनी या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केले आहे.या कार्यक्रमात विनायक मेटे भाषण करताना म्हणाले की आमच्या मनात फडणवीसच मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदरचं आहे.असं वक्तव्य विनायक मेटे यांनी केले आहे. गेल्या अडीच वर्षात केवळ […]

आमच्या मनात फडणवीसच मुख्यमंत्री – विनायक मेटे

मुंबईतील वाय.बी. चव्हाण केंद्रात विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .विनायक मेटेयांनी या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केले आहे.या कार्यक्रमात विनायक मेटे भाषण करताना म्हणाले की आमच्या मनात फडणवीसच मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांचा आम्हाला आदरचं आहे.असं वक्तव्य विनायक मेटे यांनी केले आहे. गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार गेल्या सरकारने केला. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचे काम मागील सरकारने केले. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुपर सीएम असल्याची चर्चा सुरू असताना आता मेटे यांनी केलेल्या वक्तव्याने नवे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

विनायक मेटे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर आदीदेखील उपस्थित होते. विनायक मेटे यांनी म्हटले की, मी या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये अनेक वेळा मोर्चे काढले, पण उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अशोक चव्हाण यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तुम्ही तुमच्या सरकार मध्ये आरक्षण देण्याचं काम केले होते. मागील सरकारने एकाही समाजाला न्याय दिला नाही. गेल्या अडीच वर्षात केवळ भ्रष्टाचार गेल्या सरकारने केला. आपल्याला कोणी न्याय देणारं असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस आहेत”.गेल्या अनेक वर्षांमध्ये मराठा समाजाच्या मागणीकडे कोणीही लक्ष दिले नाही. ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण यांनी घालवले. सगळ्या समाजाच्या लोकांवर अन्याय करण्याचं काम मागील सरकारने केले. असल्याची टीका विनायक मेटे यांनी केली. तुमच्याबद्दल खात्री असून तुम्ही समाजाला न्याय द्याल, अशी अपेक्षा विनायक मेटे यांनी व्यक्त केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number