जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
नवी मुंबईत मानलेल्या अल्पवयीन मुलानेच आईची हत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. किरण तमा असं मृत महिलेचं नाव आहे. सायन-पनवेल मार्गावरील वाशी गावाजवळ एका लोखंडी पेटीत महिलेचा मृतदेह आढळला होता. ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर ॲसिड देखील टाकण्यात आल्याचं समोर आलं, या क्रूर हत्येचा अखेर उलगडा लागला आहे.
आई आपल्याला वाईट वागणूक देते आणि नेहमी टोचून बोलते या रागातून एका अल्पवयीन मुलानं 3 साथीदारांच्या मदतीनं आईची हत्या केली आहे. अल्पवयीन मुलानं या हत्येची कबुली पोलिसांना दिली असून, तुर्भे पोलिसांनी आरोपीला बंगळुरुमधून अटक केली आहे, तर 2 साथीदारांना ताब्यात घेतलं आहे.