Nagpur Crime: साखर झोपेतच कुऱ्हाडीने सपासप वार करून व्यक्तीची निर्घृण हत्या; माहेरी आलेल्या मुलीच्या भूतकाळाशी निघालं हत्येचं कनेक्शन

नागपूर शहरात 43 वर्षीय मेताबसिंह चौधरी यांची घराबाहेर शेडखाली झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. 

Nagpur Crime: साखर झोपेतच कुऱ्हाडीने सपासप वार करून व्यक्तीची निर्घृण हत्या; माहेरी आलेल्या मुलीच्या भूतकाळाशी निघालं हत्येचं कनेक्शन

नागपूर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे चित्र समोर आले आहे. मानकापूर परिसरात 43 वर्षीय मेताबसिंह चौधरी यांची घराबाहेर शेडखाली झोपेत असताना कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,बांधकामस्थळी मिस्त्री म्हणून काम करणाऱ्या चौधरीने त्याच्या मुलीचे लग्न मध्य प्रदेशातील व्यक्तीसोबत लावून दिले होते.

मात्र नवऱ्याशी पटत नसल्याने मुलगी 10 महिन्यांपूर्वी नागपुरात परत आली होती. विभक्त राहणाऱ्या मुलीने पहिल्या पतीकडे परत जावे, यासाठी मेताबसिंह चौधरी त्यांचा यांनी प्रयत्न केले होते. ती पुन्हा नागपुरात येऊन प्रियकर रोहित गौतमसोबत राहत होती. मुलीच्या प्रेमसंबंधाला त्यांचा विरोध होता. याच कारणातून संतप्त झालेल्या रोहित गौतमने हत्येचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यावेळी काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि हाफ बर्म्युड्यावर रोहित गौतम आला आणि त्याने कुन्हाडीसारख्या शस्त्राने मेहताबसिंह यांच्या डोक्यात अनेक वार केले.

हेही वाचा- Mumbai Rain Accident : मुंबईत पावसाचा जोर कायम असताना दुर्घटनांचे सत्रही सुरू; कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हत्या करून आरोपी अंधाराचा फायदा घेत तेथून पसार झाला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले असून, चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती आहे. आरोपी हा स्कूल व्हॅन चालक असून, संबंधित तरुणी सध्या सहा महिन्यांची गरोदर आहे. मेताबसिंह चौधरी हे संबंधित तरुणीचे वडील होते. नागपुरात गेल्या तीन दिवसांतील ही तिसरी हत्या असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number