बागेश्वर धाम धिरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज बद्धल वक्तव्य केलं होतं. हिंदू कथाकार धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप होताच विविध राजकीय पक्षांनी तीव्र निषेध नोंदवला. त्यानंतर या वाढत्या दबावानंतर अखेर बागेश्वर बाबांनी त्यांची भूमिका बदलत माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे मान्य करत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
या माफीनाम्यानंतरही राज्यभरातून संताप व्यक्त होत असताना बागेश्वर बाबांवर टीकेची झोड उठली होती. महाराष्ट्रातून झालेल्या तीव्र प्रतिक्रियेनंतर त्यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केलं आहे. नागपुरात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा दिव्यदरबार आणि कामकथा कार्यक्रम आयोजित करण्याच आला होता. त्यावेळी त्यांनी मी जेव्हा नागपुरात येतो तेव्हा काहीतरी वाद नक्कीच होतो. अशा प्रकारचं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यावर कोणाची काय प्रतिक्रिया येते हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.