Jalgaon Crime : अंधश्रद्धेचा कळस! "शनी उतरवून देतो" म्हणत थेट रस्त्यात गाठलं अन् भामट्यांनी लंपास केली सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम

जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला विश्वासात घेऊन, 'तुमचा शनी उतरवून देतो' असे आमिष दाखवत दोन भामट्यांनी सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Jalgaon Crime : अंधश्रद्धेचा कळस! &quotशनी उतरवून देतो&quot म्हणत थेट रस्त्यात गाठलं अन् भामट्यांनी लंपास केली सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम

जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाला विश्वासात घेऊन, 'तुमचा शनी उतरवून देतो' असे आमिष दाखवत दोन भामट्यांनी सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा- Pimpri-Chinchwad viral video : पालकांची बेफिकिरी? चिमुकल्याच्या हातात दिलं रिक्षाचं स्टेअरिंग, मुख्य रस्त्यावर….

जळगाव रा. जिल्हा बँक कॉलनी, खोटे नगर येथील गजानन विठोबा सजेराव वयवर्ष 60 हे 20 एप्रिल रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास आपल्या मुलीकडे जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबले होते. यावेळी दोन अज्ञात तरुण त्यांच्याजवळ आले. त्यांनी गजानन सजेराव यांना बोलण्यात गुंतवून "तुमच्यावर शनीचा प्रभाव आहे, आम्ही तो काढून देतो," असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. भामट्यांनी त्यांना बसस्थानकातील बंद असलेल्या पोलीस चौकीच्या आडोशाला नेले.

तिथे सजेराव यांच्या हातातील 4.5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (किंमत 25,430० रुपये) आणि खिशातील 900 रुपये रोख असा एकूण 26,330 रुपयांचा मुद्देमाल स्वतःकडे घेतला. त्याबदल्यात सजेराव यांच्या हातात एक कडे दिले आणि त्यांना मागे न पाहता पुढे चालत जाण्यास सांगितले. सजेराव पुढे गेल्यानंतर दोन्ही भामट्यांनी तिथून पळ काढला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number