जळगाव जिल्ह्यात ५ मुलींवर वसतिगृहातच अत्याचार

एरंडोल तालुक्यात एका गावातील मुलींच्या वस्तीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण तेथील केअर टेकरने केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊन ठेपला आहे. सुरक्षा रक्षकानेच मुलींवर अत्याचार केल्यांनतर विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न पालकांना पडला आहे. संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. या सगळ्यावर कधी आळा बसणार , […]

जळगाव जिल्ह्यात ५ मुलींवर वसतिगृहातच अत्याचार

एरंडोल तालुक्यात एका गावातील मुलींच्या वस्तीगृहातील पाच अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण तेथील केअर टेकरने केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येऊन ठेपला आहे. सुरक्षा रक्षकानेच मुलींवर अत्याचार केल्यांनतर विश्वास ठेवायचा कोणावर असा प्रश्न पालकांना पडला आहे. संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातही अत्याचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत. या सगळ्यावर कधी आळा बसणार , असाच प्रश्न महिलांच्या मनात आहे.

या प्रकरणी बुधवारी स्वतः पोलिसांनी फिर्याद दाखल केली असून त्या फिर्यादीवरून केअर टेकर तसेच त्याला साथ देणाऱ्या त्याची पत्नी, वस्तीगृहाच्या अधीक्षका तसेच सचिव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी अटकेत आहेत. तर पीडित मुलींना बालसुधार गृहात दाखल करण्यात आले आहे.

एरंडोल तालुक्यातील खडके गावात शासन मान्यतेचे खासगी संस्थेचे मुलींचे वस्तीगृह आहे. गेल्या जून महिन्यात हे वस्तीगृह बंद पडल्यानंतर या वस्तीगृहात असलेल्या पाच मुलींना जळगावातील शासकीय मुलींच्या निरीक्षणगृहात दाखल करण्यात आले आहे. या मुली त्या ठिकाणच्या वातावरणात रुळल्या. सर्वांचा विश्वास संपादन झाल्यानंतर या मुलींनी वस्तीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे खडके येथील वस्तीगृहात असताना आपल्यासोबत तेथील केअर टेकरने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यामुळे मुलींना वसतिगृहातही ठेवणे सुरक्षित नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number