Jalgaon News : अंगावरची हळदही उतरली नाही, दारात मंडप तसाच अन् लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांतच काळाने घातला घाला

हातावरील मेहंदीचा रंगही फिका झाला नव्हता, तोच अवघ्या सहा दिवसांत एका दुर्दैवी घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली. जळगावात भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत नवविवाहितेचा मृत्यू झालाय.

Jalgaon News : अंगावरची हळदही उतरली नाही, दारात मंडप तसाच अन् लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांतच काळाने घातला घाला

लग्नाच्या आनंदावर अवघ्या सहा दिवसांतच दु:खाची काळी छाया पसरल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सोमवारी जळगाव शहरात विद्यापीठासमोर भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 21 वर्षीय नवविवाहितेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत विवाहिता 21 वर्षीय वैशाली भाऊसाहेब पाटील ही रा. कोळपिंप्री, ता. अमळनेरची असून वैशाली पाटील यांचा 7 जुलै रोजी जळगावातील गुजराल पेट्रोल पंप परिसरातील देवराम नगर येथे वास्तव्यास असलेले पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला होता.

हेही वाचा- Vardha Dowry News : हुंड्याचे आणखीन किती बळी? वर्ध्यात विवाहितेनं संपवलं जीवन; पतीसह आठ जणांवर गुन्हा दाखल

विवाहानंतर देवदर्शन झाल्यावर ते आपल्या घरी परतले होते. दरम्यान नवविवाहिता वैशाली यांना माहेरी घेऊन जाण्यासाठी तिचे काका प्रवीण सूर्याजी पाटील हे जळगाव येथे आले होते. त्यावेळेस दुपारच्या सुमारास विद्यापीठासमोरील रस्त्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, वैशाली यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.

तर या अपघातात तिचे काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवून संसाराची सुरुवात केलेल्या कुटुंबावर नियतीने मोठा आघात केला. आनंद, उत्साह आणि शुभेच्छांनी भरलेले वातावरण काही दिवसांतच दुःखात बदलले. या घटनेमुळे नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांमध्ये शोककळा पसरली असून नवविवाहितांच्या आयुष्यात एवढ्या कमी कालावधीत घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number