गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यात कोणत्याही सिनेमातल्या ऍक्शन सीनलाही लाजवेल अशी घटना घडली आहे. गोंदियाच्या गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी येथे काही वर्षांपूर्वी जेलमध्ये असलेल्या भुरु उर्फ देवेंद्र ताराम याने सुनील कांबळे याचे वडील आसाराम कांबळे यांचा खून केला होता. आणि तो नुकताच जामिनावर सुटल्यावर बाहेर आला. मात्र, सुनील कांबळे त्याचा मुलगा हा शांत बसला नाही. त्याने वडिलांच्या हत्येचा थेट बदला घेतला. 8 दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून सुटल्यानंतर देवेंद्र हा तुरुंगातून बाहेर आला असून आपल्या गावी परतला होता. आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्याच्या सुडाच्या भावनेने संधी साधून सुनील कांबळे याने देवेंद्रला गावातच पकडलं आणि तलवारीने सपासप वार केले. मान, हात, पाय आणि पोटाला झालेल्या गंभीर जखमांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. देवेंद्रची हत्या केल्यानंतर सुनील कुठे पळून गेला होता. हत्येनंतर आरोपी सुनील कांबळे याने पोलीस पाटलांसमोर समर्पण केलं. याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.