गोवा विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे. गोव्यात भाजपाने १८ जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहेत. गोव्यात मतमोजणी दरम्यान सुरुवातीला प्रमोद सावंत पिछाडीवर होते मात्र, आता प्रमोद सावंत ३०० मतांनी पुढे आले आहेत. तर उत्पल पर्रीकर पिछाडीवर आहेत.
दरम्यान, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने आघाडी मारली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा शानदार विजयाकडे असून मणिपूर, गोवा आणि उत्तराखंडमध्येही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पंजाबमध्ये आप पक्ष बहुमताच्या दिशेने आहे.