उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील लोनी बॉर्डर पोलीस ठाणे हद्दीत बँकेतील सिक्युरिटी गार्डने बँक मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टी नाकारल्यानं सिक्युरिटी गार्ड रवींद्र हुड्डा याने मॅनेजर अभिषेक शर्मा यांची गोळी झाडून हत्या केली. सोमवारी 16 मार्च रोजी दुपारी 1:45 च्या सुमारास पंजाब अँड सिंध बँकेत ही घटना घडली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी मॅनेजर अभिषेक शर्म यांना बाईकने दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात पोहोचवले, परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान गोळीबारानंतर आरोपी रक्षक घटनास्थळावरून फरार झाला आहे.