‘स्थानिक प्रकल्पाच्या बाजूने’

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन वाद आता चांगलाच चिघळल्याचं चित्र असून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतःच शेतकऱ्यांच्या समर्थनाचा आकडा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले […]

‘स्थानिक प्रकल्पाच्या बाजूने’

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन वाद आता चांगलाच चिघळल्याचं चित्र असून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तसेच पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध कायम आहे. या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे.

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच शेतकऱ्यांच्या समर्थनाचा आकडा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की,” मी स्वतः उद्योग मंत्र्यांशी बोललोय. माझी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा झाली. सध्या तिथे शांतता असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही, अशा प्रकारची माहिती मला कलेक्टर आणि सिपीने ” दिलेली आहे. हे सर्व आमचे भूमिपुत्र आहेत. त्यांच्या इच्छेविरुद्ध कुठलाही प्रकल्प आणून त्यांच्यावर अन्याय करायचा नाही. 70 टक्के शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला पाठिंबा आहे”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला

बारसू रिफानरी प्रकल्पासाठी मातीचे सर्वेक्षण सुरु असताना आता दुपारी मोठ्या प्रमाणावर आंदोलक सर्वेक्षणाच्या ठिकाणी दाखल झाले होते. यामध्ये महिला, पुरुष आणि तरूणांचा समावेश होता. पोलिस आणि आंदोलक एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे काही वेळापुर्वीचे दृष्य होते. या आंदोलकांना घटनास्थळावरून हटविण्यासाठी पोलीसांचा मोठा फौजफाटा देखील होता. या पोलिसांनी आंदोलकांना घटनास्थळावरून हटवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रूधुरांचा वापर केला होता. या लाठीचार्ज आणि अश्रूधुरांच्या आंदोलकांवरील वापरानंतर वातावरण चांगलेच तापले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number