‘मंत्रिपद हुकलेले आमदार ‘मातोश्री’च्या संपर्कात’

मुंबई, ६ जुलै २०२३, प्रतिनिधी: मुख्यमंत्री शिंदेचा नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेतील ८ ते १० आमदारांनी स्वगृही परतण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शिंदे गटातील २ आमदारांत मुंबईत झटापट झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर लगेच विनायक राऊत यांनी हा दावा केल्यामुळे राज्याचा राजकारणात आणखी एक भूकंप होण्याचा दावा केला […]

‘मंत्रिपद हुकलेले आमदार ‘मातोश्री’च्या संपर्कात’

मुंबई, ६ जुलै २०२३, प्रतिनिधी: मुख्यमंत्री शिंदेचा नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेतील ८ ते १० आमदारांनी स्वगृही परतण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधल्याचा दावा खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शिंदे गटातील २ आमदारांत मुंबईत झटापट झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर लगेच विनायक राऊत यांनी हा दावा केल्यामुळे राज्याचा राजकारणात आणखी एक भूकंप होण्याचा दावा केला जात आहे.

ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले की,

८ ते १० आमदार आमच्या संपर्कात आहेत. ज्यांना मंत्रिपदं मिळालेली नाहीत असे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागातले आमदार आमच्या संपर्कात आहेत. जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावं आम्ही सांगणार नाहीत. परंतु त्यांनी मंत्रिपदाचे कपडे शिवले होते, ते संपर्कात आहेत. कालच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर काही आमदार धावून गेल्याचं मी ऐकलं आहे. पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेंच्या वाट्याला केवळ दोन ते तीन मंत्रिपदं मिळतील. असाही दावा विनायक राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे मागचं सगळं विसरुन गेलेले आहेत, ते आम्हांला माफ करतील, असं म्हणत आमदार ‘मातोश्री’च्या संपर्कात असल्याचं राऊतांनी स्पष्ट केलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number