छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या पाचोड येथील कल्याणनगर परिसरात माणूसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना घडली आहे. एका 80 वर्षीय वृद्ध आजीवर लैंगिक अत्याचार झाल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी रोहन साहेबराव आहीरे (वय 28, रा. कल्याणनगर, पाचोड) याच्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचोड पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास सुसाट वारा सुटल्याने रोहन आहेर याने मदतीचे नाटक करत वृद्ध महिलेला घरात नेले आणि तिच्याशी जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला, वृद्ध महिलेच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक आणि महिलांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिला रोहनच्या तावडीतून सोडवले नातेवाईकांच्या मदतीने पीडित महिलेला पाचोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक राम बारहाते करीत आहेत.