14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने घेतला. ही दहशतवादी संघटना पाकिस्तानात सक्रिय आहे.
जैशचा म्होरक्या मसूद अजहर भारतीय संसदेवरील हल्ला, तसेच पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.या संघटनेवर कारवाई करण्यासाठी जगभरातून पाकिस्तानवर दबाव वाढत आहे.या प्रकरणी ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानपदी विराजमान झालेल्या इम्रान खान यांनी आधीच्या सरकारवर दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे.
आधीच्या कोणत्याही सरकारने दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांवर कारवाई केली नाही परंतु आपलं सरकार देशाबाहेरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असणाऱ्या कोणत्याही दहशतवादी संघटनेला पाकिस्तानचा वापर करु देणार नाही अस ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
आधीच्या सरकारवर टीका करून इम्रान खान यांनी पाकिस्तानात दहशतवादी संघटना सक्रीय आहेत हे मात्र स्पष्ट केलं आहे. सिंधमधील थारपारकर जिल्ह्यात आयोजित एका सभेत पंतप्रधान खान बोलत होते.
पाकिस्तानने इस्लामिक दहशतवाद्यांविरूद्ध कारवाईची तीव्रता वाढवली आहे.
पाकिस्तानी सरकारने १८२ मदरसे नियंत्रणात घेतले असल्याची घोषणा केली आहे
पाकिस्तानने बंदी घातलेल्या संघटनांशी संबधित असलेल्या १०० दहशतवाद्यांना अटक केली आहे.
ही कारवाई योग्य नियोजन करून करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
१२१ समाजकंटकांना प्रतिबंधित कारवाई म्हणून तुरुगांत टाकण्यात आल्याचेही मंत्रालयाने सांगितले.
दरम्यान ‘तहरीक-ए-इन्साफ’ पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही नॅशनल अॅक्शन प्लानवर गांभिर्याने विचार करत आहोत.
या धोरणांतर्गत दहशतवाद आणि अतिरेकीपणा नष्ट करण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.असं हि त्यांनी सांगितले आहे.