झणझणीत मसाल्याचा ग्राहकांना ठसका

थंडीचा जोर कमी होताच अन्‌ उन्हाळा सुरु झाल्याची चाहूल लागल्याने महिलांकडून मसाला पदार्थ बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. वर्षभर पुरेल इतकी साठवण महिला दरवर्षी करून ठेवतात. उन्हाच्या कडक झळा सहन करत मिरच्यांची देठ काढून ती वाळवून मसाला करण्यापेक्षा रेडी टू मिक्स मसाले वापरण्यात सध्याच्या पीढीचा कल आहे. तर दुसरीकडे मागील वर्षी […]

झणझणीत मसाल्याचा ग्राहकांना ठसका

थंडीचा जोर कमी होताच अन्‌ उन्हाळा सुरु झाल्याची चाहूल लागल्याने महिलांकडून मसाला पदार्थ बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल खरेदीसाठी लगबग दिसून येत आहे. वर्षभर पुरेल इतकी साठवण महिला दरवर्षी करून ठेवतात. उन्हाच्या कडक झळा सहन करत मिरच्यांची देठ काढून ती वाळवून मसाला करण्यापेक्षा रेडी टू मिक्स मसाले वापरण्यात सध्याच्या पीढीचा कल आहे. तर दुसरीकडे मागील वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे मिरचीच्या उत्पादन घट झाली. याचा एकूण परिणाम बाजारात मिरचीच्या खरेदी विक्रीत घट झाली. तर मिरच्यांच्या भावात किलोमागे ५० ते १०० रूपयांनी दरात वाढ झाली आहे.

स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी लागणाऱ्या मसाल्याचे व्यंजना मध्येही भाववाढ झाली आहे. जिरे बडीशेप यासारख्या पदार्थाचीही वाढ दिसून येत आहे. मिरचीचे दरातही वाढ असल्याने सर्व सामान्य गृहिणींचे स्वयंपाकघरातील आर्थिक बजेट कोलमडले आहे.
या वर्षीचे गरम मसाल्याचे दर पाहुयात

                 या वर्षीचे दर               मागील वर्षीचे दर
दगडफूल – ४७० रुपये                   ४५० रुपये

हळद –        १८०                               १४०

जिरे            ४००                                ३००

धने             १८०                                 १२०

बडीसोप     २२०                                १६०

लवंग           ८००                              ७००

मिरे             ७००                             ६००

शहाजिरे      ६८०

मसाले खरेदी करण्यावर गृहिणींचा कल वाढला आहे.परिणामी होलसेल तसेच किरकोळ बाजारात लाल सुक्या मिरच्यांची मागणी कमी झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत. लाल मिरच्यांचे एकूण २७ प्रकार आहेत. यापैकी बाजारात तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथून विक्रीसाठी मिरची येतात.
मिरच्यांचे दर पाहुयात

गुंतुर मिरची – १८० ते २२० रु

लवंगी मिरची – २८० ते ३०० रु

स्पाईसी रसगुल्ला मिरची- २२० ते २४० रु

काश्मिरी रेशीम पट्टा- ६०० ते ७५० रु

संकेश्वरी मिरची – ३८० रु

बेडगी मिरची – ४५० ते ६०० रु

“महाराष्ट्रात बहुतांश मसाल्याचे पदार्थ हे केरळ तर मिरची आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, धुळे, नंदुरबार या भागातून येते. गेल्यावर्षी पाऊस जास्त व वातावरणातील बदल यामुळे मसाले पदार्थसह मिरचीचे नुकसान झाल्याने भाव वाढले आहेत.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number