मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, प्राणीसंग्रहालय ‘या’ दिवशी सुरू राहणार

मुंबईकरांचे विरंगुळ्याचे आणि आवडते ठिकाण म्हणजे राणीची बाग होय. ही राणीची बाग सुट्टीच्या दिवशी म्हणजे १५ आणि १६ ऑगस्ट रोजी सुरू राहणार आहे. तर १७ ऑगस्ट रोजी गुरुवारी राणीची बाग बंद राहणार आहे. भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, पालिकेने या पूर्वी मंजूर केलेल्या […]

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, प्राणीसंग्रहालय ‘या’ दिवशी सुरू राहणार

मुंबईकरांचे विरंगुळ्याचे आणि आवडते ठिकाण म्हणजे राणीची बाग होय. ही राणीची बाग सुट्टीच्या दिवशी म्हणजे १५ आणि १६ ऑगस्ट रोजी सुरू राहणार आहे. तर १७ ऑगस्ट रोजी गुरुवारी राणीची बाग बंद राहणार आहे. भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, पालिकेने या पूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यामुळे त्या दिवशी वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय खुले राहणार आहे. दुसऱ्या दिवशी वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय बंद ठेवण्यात येते. प्रशासनाच्या निर्णयानुसार, १६ ऑगस्ट रोजी बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय नागरिकांसाठी खुले राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number