Maharashtra Weather Update: मुंबईत 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार पारा; रात्री गारवा तर दुपारी उकाडा; थंडी गायब होऊन पावसाची एन्ट्री?

मुंबईत वायू प्रदूषण आणि दमट हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update: मुंबईत 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार पारा; रात्री गारवा तर दुपारी उकाडा; थंडी गायब होऊन पावसाची एन्ट्री?

मुंबई: राज्यासह देशभरात सध्या निसर्गाचा  लपंडाव पाहायला मिळत असून हवामानातील अनपेक्षित बदलांमुळे नागरिक संभ्रमात आहेत. एका बाजूला उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला असताना, दुसऱ्या बाजूला मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये वाढत्या वायू प्रदूषणाने चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच एक महत्त्वपूर्ण इशारा जारी केला असून 26, 27आणि 28 डिसेंबर रोजी देशाच्या विविध भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेबाबत (AQI) बोलायचे झाले तर सध्या येथील स्थिती 'मध्यम' श्रेणीत असली तरी ती कधीही बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील हवेचा निर्देशांक साधारणपणे 100ते 150 च्या दरम्यान राहण्याचा अंदाज असून, ही हवा श्वसाचे विकार असलेल्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.

मुंबईकरांना सध्या उबदार आणि आर्द्र वातावरणाचा सामना करावा लागत आहे. शहराचे किमान तापमान 25 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारच्या वेळी वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त पाणी पिऊन स्वतःला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा; केवायसीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता? पाहा ताजी अपडेट

वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे आणि विशेषतः लहान मुले व वृद्धांची काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळच्या वेळी हवेतील आर्द्रता जास्त असल्याने वातावरणात थोडा जडपणा जाणवू शकतो. संध्याकाळच्या सुमारास तापमानात किंचित घट होऊन ते 28 ते 30 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावेल. मात्र, संध्याकाळी हलका पाऊस किंवा जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने बाहेर जाताना हवामानाचा अंदाज घेऊनच नियोजन करावे, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

देशाच्या इतर भागांतील हवामानाचा विचार करता, 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत उत्तर भारतात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या उंच डोंगराळ भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार हिमवृष्टीचा इशारा आयएमडीने दिला आहे. ईशान्येकडील राज्यांमध्येही पावसाची हजेरी लागणार असून, यामुळे थंडीचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. डोंगररांगांमध्ये होणाऱ्या या बदलांचा परिणाम मैदानी प्रदेशातील तापमानावरही होणार असून पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहू शकते.

थोडक्यात सांगायचे तर, सध्याचे हवामान आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते. मुंबईतील दमट हवा आणि प्रदूषित वातावरण, तर उत्तर भारतातील पावसाचे सावट यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. बदलत्या हवामानानुसार आपल्या आहारात आणि पेहरावात बदल करणे हिताचे ठरेल. विशेषतः प्रदूषित हवेपासून वाचण्यासाठी आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊनच नवीन वर्षाच्या स्वागताचे नियोजन करा. 

हेही वाचा: Prakash Mahajan: अखेर सस्पेन्स संपला; प्रकाश महाजन यांची नवी राजकीय इनिंग, एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांमध्ये आणखी एका नेत्याची भर

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number