Weather Update: मान्सूनचा रौद्रावतार; महाराष्ट्रासह 16 राज्यांना IMD चा रेड अलर्ट, पुढचे 10 तास धोक्याचे

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासह 16 राज्यांना मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा दिला आहे. पुढील 10 तास महत्त्वाचे ठरणार आहेत.

Weather Update: मान्सूनचा रौद्रावतार; महाराष्ट्रासह 16 राज्यांना IMD चा रेड अलर्ट, पुढचे 10  तास धोक्याचे

देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनने हजेरी लावली असली, तरी पावसाचे असमान वितरण अजूनही कायम आहे. काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे, तर काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) देशातील अनेक राज्यांसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला असून, पुढील 10 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे सांगितले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: Indian Railway Refund Rules: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! प्रवास पूर्ण झाल्यावरही मिळू शकतो तिकीटाचा रिफंड; रेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहिती आहे का?

दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, कर्नाटक, तामिळनाडू, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांसाठी विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये पुढील काही तासांत हवामानात अचानक बदल होऊ शकतो.

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या भागांमध्ये भूस्खलन आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, मान्सूनचा प्रवास काही भागांमध्ये संथ गतीने सुरू आहे. उत्तर प्रदेशात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा पोहोचला असून, बिहारच्या सीमेवर काही दिवसांपासून तो स्थिरावला होता. मात्र, हवामान विभागाच्या मते पुढील तीन ते चार दिवसांत मान्सून उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि उत्तराखंडच्या उर्वरित भागात पुढे सरकेल.

हेही वाचा: Farmer Loan Waiver: बळीराजासाठी खुशखबर! 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार कर्जमाफीचे पैसे; सरकारची मोठी घोषणा

29 आणि 30 जूनदरम्यान गोवा, तेलंगणा, कर्नाटकचा किनारी भाग, ओडिशा, केरळ, तामिळनाडू तसेच पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू शकतात.

हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक घराबाहेर न पडण्याचा, वीज पडण्याच्या शक्यतेच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचा तसेच हवामानाशी संबंधित अधिकृत सूचना नियमितपणे तपासण्याचा सल्ला दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number