जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नाशिकच्या शाळेतील मुलांच्या फी वाढीचं प्रकरण ताजं असतानाच आयआयटी मुंबईच्या फी वाढीचा प्रकारही समोर आला. आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी फी वाढीविरोधात आंदोलनाचं अस्त्र उगारलं. वाढवलेली फी त्वरीत मागे घ्यावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. या विरोधात आयआयटी कॅम्पसमध्ये रॅली काढून विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलनही केलं.