मनसे साधन सुविधा विभागाचा रविवारी (दि.११ मे) पाचवा वर्धापन दिन झाला. हा सोहळा प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे उपस्थित होते. यावेळी राज ठाकरे यांनी मुंबईतील नद्यावरुन तसेच या वर्षी पावसाळ्यात दरडी कोसळण्याची भीती व्यक्त केली. यावर त्यांनी कार्यकर्त्यांना तयार राहण्याचा सल्ला दिली. प्रशासनाच्या साधन सुविधेवरुनही ठाकरे यांनी सरकारला सुनावलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, या सगळ्या विंग आपण पक्षामध्ये वेगवेगळ्या शाखा सुरू केल्या. आपत्कालीन व्यवस्थापन पथकही स्थापन केले. या सगळ्या गोष्टींचा परिपाक म्हणून मी ब्लू प्रिंट आणली होती. तो या सगळ्या योजनांचा भाग होता. समाजामधील वेगवेगळ्या प्रश्नांवर काम करणे गरजेचे आहे. आपण अग्निशमन तलाच कौतुक केलं पाहिजे. ‘प्रत्येकवेळी कामाला मनसेला धावून येते, मदत मागायला येता, मतदानाला का येत नाही? असा परखड सवाल राज ठाकरेंनी यावेळी केला.