‘हिंमत असेल तर बजरंग दलावर बंदी घालून दाखवा’

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या खळबळजनक राजकारणात वादग्रस्त परस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसने बजरंग दलाबाबत केलेल्या घोषणेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या मालिका सुरूच आहेत. बजरंग दलावर योग्य ती कारवाई करण्याची घोषणा कॉंग्रेसने केली असून त्यांनी निवडणूक जाहीरनाम्याठी याचा समावेश केला आहे. तसेच […]

‘हिंमत असेल तर बजरंग दलावर बंदी घालून दाखवा’

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या खळबळजनक राजकारणात वादग्रस्त परस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसने बजरंग दलाबाबत केलेल्या घोषणेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पार्शवभूमीवर भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या मालिका सुरूच आहेत. बजरंग दलावर योग्य ती कारवाई करण्याची घोषणा कॉंग्रेसने केली असून त्यांनी निवडणूक जाहीरनाम्याठी याचा समावेश केला आहे. तसेच सत्ता आल्यास बजरंग दलावर बंदी घालू असं कर्नाटक काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. काँग्रेसच्या याच विधानावर फडणवीसांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
कर्नाटकातील बेळगावात भाजपाची प्रचारसभा आयोजित करण्यात अली होती. या प्रचारसभेत बोलत असताना काँग्रेसने बजरंग दलाबाबत केलेल्या विधानावर प्रत्युत्तर देत असताना ‘हिंमत असेल तर बजरंग दलावर बंदी घालून दाखवा’, असे आव्हान काँग्रेस नेत्यांना दिले आहे. तसेज काँग्रेसचे नेते हिंदुत्त्वाचा द्वेष करतात का? या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या नेत्यांनी द्यावीत. असं आव्हानही फडणवीसांनी काँग्रेसला दिलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number