‘परत येईन तर, बिबट्याला घेऊनच’

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयाचा आग्रह गेल्या तेरा दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान अनेक भारतीय युद्धभूमीत अडकले आहेत. त्यामुळे त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून ऑपरेशन गंगा मोहिमेतर्गत अडकलेले अनेक भारतीय मायदेशी परतत आहेत. मात्र, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय डॉ. गिरीकुमार पाटील यांनी अजब आग्रह धरला आहे. डॉ. गिरीकुमार पाटील यांनी पाळलेल्या प्राण्यांशिवाय […]

‘परत येईन तर, बिबट्याला घेऊनच’

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयाचा आग्रह

गेल्या तेरा दिवसांपासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धादरम्यान अनेक भारतीय युद्धभूमीत अडकले आहेत. त्यामुळे त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून ऑपरेशन गंगा मोहिमेतर्गत अडकलेले अनेक भारतीय मायदेशी परतत आहेत. मात्र, युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय डॉ. गिरीकुमार पाटील यांनी अजब आग्रह धरला आहे. डॉ. गिरीकुमार पाटील यांनी पाळलेल्या प्राण्यांशिवाय भारतात येण्यास नकार दिला आहे.

युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय डॉ. गिरीकुमार पाटील यांनी मांजर आणि काळा बिबट्या पाळला आहे. त्यामुळे पाळलेल्या प्राण्यांशिवाय भारतात येण्यास डॉ. पाटील यांनी नकार दिला आहे. गिरीकुमार पाटील यांचे म्हणणे आहे की, शहरात अनेक ठिकाणी हल्ले होत असल्यामुळे हे प्राणी घाबरलेले आहेत. तसेच त्यांचा आहार कमी झाला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाळीव प्राण्यांना सोडून जाणे अशक्य आहे.

युक्रेनमधील सेवेरोडोनेत्स्क शहरात डॉ. गिरीकुमार पाटील यांना जॅग्वार कुमार या नावानेही ओळखले जाते. युद्ध सुरू झाल्यानंतर डॉ. पाटील सर्व प्राण्यांसह बंकरमध्येच राहत आहेत. डॉ. गिरीकुमार पाटील २००७मध्ये युक्रेन इथे शिक्षणासाठी दाखल झाले होते. त्यानंर ते २०१४पासून युक्रेनमधील सरकारी रुग्णालयात काम करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number