जगभरातीत फेसबुक युझर्ससाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुरक्षेच्या कारणामुळे फेसबूकच्या 5 कोटी अकाऊंटवर प्रभाव पडणार असल्याचं सांगण्यात येतं आहे.
फेसबुकवरील व्हिव अॅज या फिचरवर हॅकर्सने हल्ला केला आहे. त्या माध्यमातून त्यांनी युझर्सचे अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे.
फेसबुक कॉम्प्युटर नेटवर्कवर झालेल्या सायबर हल्ल्यात सुमारे पाच कोटी युजर्सच्या खात्याची माहिती चोरी झाली आहे.
हा सर्व प्रकार 25 सप्टेंबरला फेसबुकच्या लक्षात आला असून फेसबुकने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. तसेच याप्रकरणी फेसबुकने माफी मागितली आहे.