टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियासह जगभरातील क्रिकेटप्रेमी सज्ज झाले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील हा हायवोल्टेज सामना 8 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यादरम्यान दोन्ही संघ जाहीर झाले आहेत. तसेच यासंदर्भात आयसीसीने एक मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने आता या मेगा-मॅचसाठी पंच आणि मॅच रेफरींची घोषणा केली आहे.
हेही वाचा- IND vs NZ Ahmedabad Narendra Modi Stadium : 2023 च्या वर्ल्ड कपची आठवण पुन्हा जागी! ‘मोदी स्टेडियम’वरील अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाचा मोठा निर्णय
शुक्रवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ आणि अॅलेक्स व्हार्फ यांना भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
यावेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) म्हटले की, इंग्लंडमधील रिचर्ड इलिंगवर्थ आणि रिचर्ड केटलबरो यांना अहमदाबाद येथे होणाऱ्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 20२३ च्या अंतिम सामन्यासाठी मैदानी पंच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अल्लाहुद्दीन पालेकर हे जेतेपद सामन्यात थर्ड अंपायर म्हणून काम पाहतील. तसेच एड्रियन होल्डस्टॉक हे चौथे अंपायर म्हणूनही काम पाहतील.
हेही वाचा- T20 World Cup Final Special Trains : टी20 फायनलसाठी चलो अहमदाबाद! क्रिकेटप्रेमींसाठी पश्चिम रेल्वेवर सुटणार स्पेशल गाड्या
दरम्यान रिचर्ड इलिंगवर्थ यांनी 2024 च्या अंतिम सामन्यात ख्रिस गॅफनी यांच्यासोबत पंच म्हणून काम पाहिले होते. त्याचसोबत 2023 च्या पुरुष विश्वचषक अंतिम सामन्यात आणि 2025 च्या पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यातही पंच म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान सोशल मीडियावर टी20 वर्ल्ड कप 2026 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यादरम्यान मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरु आहे. सुरुवातीला ही ट्रोलिंग अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरून सुरु झालेली. ज्यात आता इलिंगवर्थ यांची पंच म्हणून घोषणा झाल्यानंतर हा सामना अधिक चर्चेत आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत यापूर्वी महत्त्वाचे सामने हरला आहे, 2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील ही पराभवाच्या आठवणींमुळे चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 2023 चा वनडे वर्ल्ड कप फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला होता, तसेच यावेळी देखील इंग्लंडमधील रिचर्ड इलिंगवर्थ यांची पंच म्हणून घोषणा केली होती. यादरम्यान पराभवाच्या आठवणींमुळे चाहते ट्रोल करत आहेत.