महाराष्ट्र सरकारने मंगळवारी अनेक वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत मोठा प्रशासकीय फेरबदल केला. एका शासकीय आदेशानुसार, विविध विभागांमधील महत्त्वाच्या पदांवर नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
सर्वात महत्त्वपूर्ण बदलामध्ये, १९९३-बॅचचे आयएएस अधिकारी लोकेश चंद्र यांना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवून मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, १९९५-बॅचच्या वरिष्ठ अधिकारी अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावरून बदली करून त्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) महानगरपालिका आयुक्त बनवण्यात आले आहे.
कोणाची कुठे बदली?
विनीत वैद्य सिंगल (भाप्रसे) – यांची प्रधान सचिव , मृद आणि जलसंधरण विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.
तुकाराम मुंढे (भाप्रसे) यांची – प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन , महसूल वन विभाग येथे बदली झाली आहे.
लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांची – मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.
लहू माळी (भाप्रसे) यांची- व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित येथे बदली झाली आहे.
परिमल सिंह (भाप्रसे) यांची – सचिव (कृषी), कृषी आणि पदुम विभाग, मंत्रालय येथे बदली झाली आहे.
विकास चंद्र रस्तोगी (भाप्रसे) यांची- अप्पर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.
माणिक गुरसाळ (भाप्रसे) यांची – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे बदली झाली आहे.
पृथ्वीराज बी. पी (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त वसई विरार महानगरपालिका येथे बदली झाली आहे.
आश्विनी भिडे (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे बदली झाली आहे.
प्रेरणा देशभ्रतार (भाप्रसे) यांची- आयुक्त, मत्य्यव्यवसाय मुंबई येथे बदली झाली आहे.