‘मी माझ्या कुटुंबाला जपणारच’

मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवार वाचवण्यासाठी बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत थेट इशाराच दिला आहे. देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. […]

‘मी माझ्या कुटुंबाला जपणारच’

मुंबई, २४ जून २०२३, प्रतिनिधी :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवार वाचवण्यासाठी बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली होती. फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत थेट इशाराच दिला आहे. देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावे लागेल. तुम्हाला कोणतीही आसने झेपणार नाही. फक्त झोपावे लागेल, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी हा इशारा दिला. ते म्हणाले, मी माझ्या परिवाराबाबत संवेदशनील आहे. सूरज आणि तमाम शिवसैनिक माझा परिवार आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांचे अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत, असं सांगतानाच सूरजवर धाड टाकली. तो साधा शिवसैनिक आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी येत्या १ जुलै रोजी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली. येत्या १ तारखेला आपण महापालिकेवर मोर्चा काढणार आहोत. शनिवारी निवेदन कोणाला देणार? असा प्रश्न काही जण आम्हाला विचारत आहे. अरे आम्हाला निवेदन द्यायचेच नाही. ज्यांना निवेदन द्यायचे आहे तेच सत्ताधाऱ्यांच्या टेबलाखाली बसले आहेत. त्यामुळे निवेदन कोणाला देणार? कोव्हिड काळातील भ्रष्टाचार जरूर काढा. करोना काळात देशभरात जेवढे सर्व्हे झाले त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आलं. ही यांची पोटदुखी आहे. भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्यांचे नाव सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत आले नव्हते. त्यामुळेच त्यांची पोटदुखी आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांना जमाल गोटा द्यायचा आहे. त्यांना घोड्याचं औषध द्यावे लागेल. तरच त्यांचा कोठा मोकळा होईल, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरे यांनी केला.

आपला संपूर्ण देश हा देशातील संस्कारामुळे आणि देशवासियांच्या संयमामुळे चालला आहे. भाजपच्या हातून देश कधीच सुटला आहे. उद्धव ठाकरेंना तुम्ही खलनायक ठरवत आहात. मी नायक की खलनायक हे जनता ठरवेल. पण तुम्ही नालायक आहात हे जनतेला माहीत आहे, अशी टीका त्यांनी केली. आजही मी जिथे जातो जिथे लोक मला भेटतात. परदेशातही लोक मला भेटली. नमस्कार केला. म्हणाले, साहेब तुमच्यामुळे आम्ही वाचलो. परदेशातील लोक म्हणाले, हे लोक तुमच्या सोबत जे करत आहेत, ते योग्य नाही. आम्ही तुमच्यासोबत आहे. या जळणाऱ्या पेक्षा आशीर्वाद देणारे अनेक आहेत, असेही ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number