‘मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर’

राज्यातील सत्तांतरानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसाच्या सुट्टीवर गेलेत. मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे २४ ते २६ एप्रिलपर्यंत नेमके सुट्टीवर का गेले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवस सुट्टीवर गेल्याने अनेक तर्क विर्तक लावले जात होते. मात्र याबाबत आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले हे. […]

‘मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर’

राज्यातील सत्तांतरानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसाच्या सुट्टीवर गेलेत. मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दावे-प्रतिदावे रंगल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे २४ ते २६ एप्रिलपर्यंत नेमके सुट्टीवर का गेले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवस सुट्टीवर गेल्याने अनेक तर्क विर्तक लावले जात होते. मात्र याबाबत आता स्वत: मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले हे. मी सुट्टीवर नसून डबल ड्युटीवर आहे, असे ते म्हणाले. तसेच विरोधकांनी केलेल्या आरोपांनाही त्यांनी प्रत्तुत्तर दिले. साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली.

मी सध्या सातारा दौऱ्यावर आहे. इथे येऊन मी तापोळ्यातील पुलाची पाहणी केली आणि तापोळा महाबळेश्वर रस्त्याचे भूमिपूजन केले. तसेच महाबळेश्वर येथील पर्यटनांच्या दृष्टीनेही आढावा बैठकही घेतली, त्यामुळे मी सुट्टीवर आहे, हे खरे नाही तर मी डबल ड्युटीवर आहे, असे चोख प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले.

पुढे बोलताना बोलताना त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. विरोधक माझ्यावर आरोप करतात मुख्यमंत्र्यांकडे आता कुठलेही काम शिल्लक राहिलेले नाही. विरोधकांना आरोप केल्याशिवाय दुसरे कुठलेही काम राहिलेले नाही. आम्ही त्यांना घरी बसवले. त्यामुळे ते आरोप करत करत सुटले. आम्ही त्यांना आरोपाचे उत्तर कामाने देऊ, असे ते म्हणाले. तसेच “मी साताऱ्यात येऊन आराम केलेला नाही. साताऱ्यात आल्यानंतर अनेक जण भेटायला आले. येथील जनतेचे प्रश्न सोडवण्यावर माझा भर आहे. त्यासाठी सातत्याने बैठका होत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number