मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फॅन असून महाराष्ट्रात त्यांनी चांगलं काम केले असल्याचे कॉंग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी कौतुक केले आहे. कॉंग्रेस आमदारांनी कौतुक केल्यामुळे कॉंग्रेसला घरचा आहेर दिला आहे. कॉंग्रेसचे नेते नेहमी भाजपावर टीका करत असते मात्र त्यांच्याच आमदारांनी कौतुक केल्याचे दिसत आहेत.
मुंबईमध्ये झालेल्या पोलिसांच्या ईद मिलन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमात कॉंग्रेसचे आमदारही उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी मोठा फॅन असल्याचे कॉंग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी म्हटलं.
त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात अनेक चांगली कामं केली आहेत, असे म्हणत त्यांचे कौतुक केले.
कॉंग्रेस नेते भाजपावर टीका करत असतात मात्र आमदारांनी कौतुक केल्यामुळे कॉंग्रेसला घरचा आहेर दिला आहे.