जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
मुंबई-पुणे प्रवास आता कमी वेळात कापणं शक्य होणार आहे. अवघ्या 20 मिनिटांत मुंबई-पुणे प्रवास तुम्ही करु शकता.
वाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान आणलं जाणार आहे. हायपर लूप वन आणि राज्य सरकारमध्ये यासंदर्भात करार झालाय.
नाना कारणांनी मुंबई-पुणे प्रवास त्रास देणारा ठरतोय. त्यामुळे हायपरलूपसारखे पर्याय नागरिकांना नक्कीच दिलासादायक ठरतील.
मात्र, अशाप्रकारची अद्यायावत सुविधा प्रत्यक्षात साकारायला कधी मुहूर्त मिळेल, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.