जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईकरांच्या सेवेसाठी आता हायब्रिड बस सेवा सुरू करण्यात आली आहे. 25 हायब्रिड बसेस आता मुंबईत धावणार आहे.
या बसेस संपूर्ण वातानुकुलित असणार आहे. यामध्ये वायफायची सुविधा, मोबाईल चार्जिंग, एलईडी स्क्रीन, एफ एम, सीसीटीव्ही सुविधा असून 31 सीट आहेत. या बसमधून प्रवाशांना आरामदायक प्रवास करता येणार आहे.
एका बसची किंमत 2 कोटी रुपये आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीस 80 बसेस सुरू करणार आहेत, तसेच मुंबईकरांच्या मागणीनुसार आम्ही या बसेसची संख्या वाढवू, असं एमएमआरडीएचे अधिकारी शंकर देशपांडे यांनी सांगितले.
हायब्रिड बसचे जास्तीत जास्त भाडे 105 रुपये, तर कमीत कमी 15 रुपये असेल. बोरीवली-बीकेसी आणि खार बीकेसीमधील भाडे 105 रुपये तर ठाणे-बीकेसी मधील भाडे 90 रुपये असेल. मुलुंड-बीकेसीमधील भाडे 60 रूपये असण्याची शक्यता आहे. बांद्रा आणि कुर्ला स्टेशनमधील भाडे 15 ते 25 रुपयांच्या आत असेल.