जय महाराष्ट्र न्यूज , मुंबई
पती पत्नीचे नाते म्हणजे विश्वासाचे नाते समजले जाते. पण नागपूरच्या यशोधानगरीत घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण परिसरात अत्यंत खळबळ
उडाली आहे.
पतीने वाढदिवसाच्या दिवशी केक मधून विष देऊन आपल्या पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
पीडीत पत्नी आलिया 21 जुलै रोजी वाढदिवस असल्याने आईच्या घरी आली होती. त्यादिवशी सायंकाळच्या सुमारास पती जलिलखान वाढदिवसाच्या निमित्ताने केक
घेऊन तिच्या घरी आला.
आणि वाढदिवस साजरा करत केक कापला. पण स्वत: मात्र डायबिटीजचे कारण सांगून केक खाल्ला नाही.
काही वेळाने आलियाला उलट्या सुरु झाल्यामुळे तिला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता संपूर्ण प्रकार समोर आला.
आलिया जलिलची दुसरी पत्नी असून त्याचा आपल्या घरावर डोळा आहे असे आलियाच्या आईचे म्हणणे आहे.
लिओ रुग्णालयात आलियावर उपचार सुरु असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
पोलिस आरोपी जलिलखानचा शोध घेत आहेत.