Shirdi Temple : भाविकांच्या आरोग्याशी खेळ! साईनगरीत प्रसादाच्या पेढ्यांवर बुरशी; तर बॉक्सवर पॅकेजिंग, एक्सपायरी डेटही नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड

शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असून मंदिर परिसरातील शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अनेक भाविक साई मंदिर परिसरात असणाऱ्या खासगी दुकानदारांकडून प्रसाद विकत घेतात. मात्र या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि […]

Shirdi Temple : भाविकांच्या आरोग्याशी खेळ! साईनगरीत प्रसादाच्या पेढ्यांवर बुरशी; तर बॉक्सवर पॅकेजिंग, एक्सपायरी डेटही नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड

शिर्डी : साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू असून मंदिर परिसरातील शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अनेक भाविक साई मंदिर परिसरात असणाऱ्या खासगी दुकानदारांकडून प्रसाद विकत घेतात. मात्र या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट, तसेच हा पेढा नेमका कुठे आणि कोण बनवतो याबाबत उल्लेख नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक वर्षांपासून अक्षरशः दगडासारख्या पेढा प्रसादाची साईभक्तांना विक्री केली जात आहे. पॅकिंग केलेल्या पेढ्यांना बुरशी लागल्याचं देखील दिसून येत आहे. प्रसादाच्या नावाखाली साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झाल आहे. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी असून, श्रद्धेच्या नावाखाली भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणार तरी कधी?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

हेही वाचा : Tuljapur Temple : तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! आता मंदिर परिसरात 'हे' कृत्य केल्यास भरावा लागणार 500 रुपयांचा दंड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number