भारतीय संगीत क्षेत्राचा जादुई आवाज आणि कोट्यवधी रसिकांच्या मनावर 7 दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. आज सायंकाळी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. सर्वांनीच त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. त्यानंतर त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषद घेत मोठी घोषणा केली आहे. मंगेशकर कुटुंबीयांकडून पुण्याजवळ उभारल्या जाणाऱ्या भव्य हॉस्पिटलसंदर्भात हृदयनाथ मंगेशकर यांनी मोठी घोषणा केली आहे. आधी या हॉस्पिलटले नियोजित नाव लता मंगेशकर हॉस्पिटल असं होतं.
16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या हॉस्पिटलचं भूमिपूजन होणार असल्याची माहिती हृदयनाथ मंगेशकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या हॉस्पिटलला आधी केवळ लता मंगेशकर यांचं नाव देण्याचा निर्णय झाला होता. मात्र आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाचाही समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या संस्थेचं नाव आता 'लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस' असं ठेवण्यात येणार असल्याची माहिती हृदयनाथ मंगेशकर यांनी दिली आहे.