गोड आणि हेल्दी ‘पपर्इ जॅम’

जॅम हा प्रत्येकाच्या आणि विशेषतः मुलांच्या आवडीचा पदार्थ. त्यामुळेच आर्इ मुलांना चपाती किंवा ब्रेडला जॅम लावून डब्यात खायला देते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे जॅम्स उपलब्ध असतात. मात्र जॅम हा प्रकार तुम्ही घरीही सहज तयार करू शकता. असाच एक बनवायला सोपा आणि चवीला मस्त जॅम म्हणजे पपर्इचा जॅम… पपर्इचाही जॅम करता येऊ शकतो, हे ऐकून थोडं आश्चर्य […]

गोड आणि हेल्दी ‘पपर्इ जॅम’

जॅम हा प्रत्येकाच्या आणि विशेषतः मुलांच्या आवडीचा पदार्थ. त्यामुळेच आर्इ मुलांना चपाती किंवा ब्रेडला जॅम लावून डब्यात खायला देते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे जॅम्स उपलब्ध असतात. मात्र जॅम हा प्रकार तुम्ही घरीही सहज तयार करू शकता. असाच एक बनवायला सोपा आणि चवीला मस्त जॅम म्हणजे पपर्इचा जॅम… पपर्इचाही जॅम करता येऊ शकतो, हे ऐकून थोडं आश्चर्य वाटेल. पण पपईचा जॅम चवीलाही छान असतो आणि आरोग्यासाठीही. पपर्इतून आपल्या ए आणि सी व्हिटामिन मिळते. तसंच ते आपल्याला हेल्दी ठेवण्यास मदत करतं. 

साहित्य –

500 ग्रॅम पपर्इचा पल्प

500 ग्रॅम साखर

½ टीस्पून सायट्रिक अॅसिड

कृती-

  • प्रथम कढर्इत पपर्इचा पल्प घेऊन त्यात चवीनुसार थोडीशी साखर घालावी.
  • नंतर हे मिश्रण परतून घ्यावे.
  • मिश्रणाला उकळी येऊन दिल्यानंतर त्यात सायट्रिक अॅसिड घालावे. ( याऐवजी लिंबाचा रससुध्दा आपण टाकू शकतो.)
  • हे मिश्रण एकजीव करून ते आटेपर्यंत ढवळून घ्यावे.
  • अशा प्रकारे पपईचा जॅम तयार होतो.

आपण स्ट्रॉबेरी, मॅंगो, ऑरेंज, मिक्स फ्रूट, ब्लॅकबेरी, रासबेरी अशा बऱ्याच वेगवेगळ्या फ्लेवरचे जॅम चाखले असतील. पपईचा जॅमही असाच घरी सहज बनवता येणारा एक हेल्दी  पदार्थ आहे. तुम्हीही नक्की बनवून पाहा. मुलांना नक्की आवडेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number