हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्धव गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबत गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, आदित्य यांच्या गौप्यस्फोटामुळे राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
तुरुंगाच्या भीतीने शिंदेंनी बंड पुकारले. तसेच भाजपासोबत गेलो नाहीतर तुरुंगात असेन, असे शिंदे म्हणाले होते. तसेच शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असा गौप्यस्फोट आदित्य यांनी केला आहे. यावर भाजपा नेते नितेश राणे प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांनी ट्विट केले की, तुरुंगाच्या भीतीने शिंदे साहेब भाजपासोबत गेले. मग पेंग्विन आणि युटी म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी दीशा सालियनच्या खटल्याच्या भीतीने कोणा-कोणाचे हातपाय पकडले, गप्प करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट लवकरच करावा लागेल. ‘मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है’ असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
जेल च्या भितीने शिंदे साहेब भा ज प बरोबर गेले.. मग penguin आणि UT ने Disha salain च्या केस च्या भितीने कोणा कोणाचे हात पाय पकडले.. गप्प करायला कोणाला किती पैसे दिले हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच !!! 'मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है' — Nitesh Rane (@NiteshNRane) April 12, 2023
हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले होते, असा दावा केला. आदित्य यांना शिंदेंच्या बंडाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यावेळी आदित्य म्हणाले, तुरुंगाच्या भीतीने शिंदेंनी बंड पुकारले. तसेच भाजपासोबत गेलो नाहीतर तुरुंगात असेन, असे शिंदे म्हणाले होते. तसेच शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असेही आदित्य म्हणाले. शिवसेना सोडून गेलेले आमदार हे स्वत:साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होण्याच्या भीतीने शिंदे आमच्या घरी येऊन रडले होते. तसेच भाजपासोबत गेलो नाही तर अटक करतील असेही शिंदे म्हणाले होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.