नवी दिल्ली: जेव्हा आपण कमी पाणी पिणाऱ्या प्राण्याचा विचार करतो, तेव्हा सर्वप्रथम आपल्याला उंटाचीच आठवण येते. वाळवंटात उंट अनेक दिवस पाण्याशिवाय प्रवास करतात. मात्र, तुम्हाला माहीत आहे का? एक असाही प्राणी आहे, जो कधीही पाणी पित नाही. या प्राण्याचं नाव आहे कांगारू रॅट.
हा एक लहान उंदीरवर्गीय प्राणी असून अमेरिकेतील उष्ण वाळवंटी प्रदेशात आढळतो. विशेष म्हणजे, कांगारू रॅटला पाण्याची अजिबात गरज भासत नाही. कारण तो स्वत:च्या शरीरातूनच पाण्याची निर्मिती करतो. कांगारू रॅट बिया आणि काही वनस्पती खातो. त्यातून मिळालेल्या कार्बोहायड्रेट्सपासून उर्जा तयार होताना शरीरातून पाण्याचे मूलभूत घटक तयार होतात. या प्रक्रियेला चयापचय जल निर्मिती असेही म्हणतात. या वैशिष्ट्यामुळेतच हा प्राणी पाण्याशिवाय जगू शकतो.
कांगारू रॅटचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याच्या शरीराची रचना पाणी साठवून ठेवण्यासाठी अनुकूल आहे. यासोबतच, कांगारू रॅटची विष्ठा कोरडी असते, यामुळे पाण्याची उधळण होत नाही. दिवसाच्या वेळी कांगारू रॅट त्याच्या बिळात राहतो. बाहेरील हवेच्या तुलनेत बिळातील हवा अधिक थंड आणि किंचिच ओलसर असते. त्यामुळे, त्याच्या शरीरातील पाण्याचे वाफेत रुपांतर कमी होते. तो फक्त रात्रीच बाहेर पडतो, तेव्हा बाहेरील हवामान गार असते. विशेष बाब म्हणजे, रात्रीच्या जीवनशैलीसाठी कांगारू रॅटचे शरीर पूर्णपणे चांगले आहे. त्याचे मोठे डोळे आणि कान त्याला अंधारात शिकार ओळखण्यासाठी मदत करतात. कांगारू रॅटची लांब शेपूट त्याला उडी मारताना संतुलन राखण्यास मदत करते.
उड्या मारताना कांगारू रॅटला संतुलन राखण्यासाठी लांब शेपूट उपयोगी ठरते. सोबतच, त्याच्या गालातील आतीलबाजूमध्ये केसांनी बनवलेल्या पिशव्या असतात. त्याच्या गालाच्या आतील बाजूस केसांनी बनवलेल्या पिशव्या असतात. या पिशव्यांमध्ये तो खाद्यसाठा ठेवतो आणि बिळात नेतो. वाळवंटातील कोरडे आणि गरम वातावरणात कांगारू रॅटने अशी विशेष शारीरिक आणि जीवनशैली विकसित केली आहे. पाण्याचा एक थेंबही न पिता जगण्याची त्याची क्षमता खरंच आश्चर्यकारक आहे. त्यामुळेच, तो निसर्गातील एक रहस्यमय प्राणी मानला जातो.