…अशी लढवली शक्कल आणि बिग बी पोहोचले सेटवर

मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : बिग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या सुंदर अभिनयासह शिस्तबद्धतेसाठी देखील ओळखले जातात. कार्यक्रम कोणताही असो ते नेहमीच वेळेचे काटेकोरपणे पालन करतात. दरम्यान सध्या ते एका चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे सध्या मुंबईत शूटिंग सुरु आहे, परंतु मुंबईच्या ट्रॅफिकमुळे त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. अशातच […]

…अशी लढवली शक्कल आणि बिग बी पोहोचले सेटवर

मुंबई, १५ मे २०२३, प्रतिनिधी : बिग बी अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे त्यांच्या सुंदर अभिनयासह शिस्तबद्धतेसाठी देखील ओळखले जातात. कार्यक्रम कोणताही असो ते नेहमीच वेळेचे काटेकोरपणे पालन करतात. दरम्यान सध्या ते एका चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे सध्या मुंबईत शूटिंग सुरु आहे, परंतु मुंबईच्या ट्रॅफिकमुळे त्यांना बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. अशातच त्यांनी एक शक्कल लढवली. हे पाहून नेटकरी त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत.


मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकल्याने बिग बींनी एक शक्कल लढवली. त्यांनी चक्क एका अनोळखी दुचाकीस्वाराकडे मदत मागितली. मग त्या व्यक्तीच्या दुचाकीवर बसून ते सेटवर वेळेत पोहोचले. विशेष म्हणजे हा फोटोसुद्धा त्यांनी समाज माध्यमांवर सामायिक केला आणि त्या फोटोखाली, ‘या प्रवासासाठी धन्यवाद मित्रा. मी तुला ओळखत नाही, पण तू मला सेटवर वेळेत पोहोचण्यास मदत केली. या ट्रॅफिक जॅममधून तू तुझं काम जलदगतीने केलंस. पिवळा टी-शर्ट, शॉर्ट्स आणि कॅपचा मालक, तुझे आभार!’ असे लिहिले आहे. बिग बींच्या या पोस्टवर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number