काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात घरांना तडे

उत्तराखंडच्या जोशीमठासारखी आपत्ती जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. जम्मूच्या दोडा जिल्ह्यामध्ये जमीन खचल्याने २१ घरांना तडे गेले आहेत. माहिती मिळताच थाथरीचे एसडीएमक्स` यांनी आपत्तीग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी नेले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे पथकही घटनेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोहोचले आहे. या गावातील काही इमारतींना काही दिवसांपूर्वीच तडे जाऊ लागले होते. परंतु गुरुवारी झालेल्या भूस्खलनामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. बऱ्याच इमारतींचे […]

काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात घरांना तडे

उत्तराखंडच्या जोशीमठासारखी आपत्ती जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. जम्मूच्या दोडा जिल्ह्यामध्ये जमीन खचल्याने २१ घरांना तडे गेले आहेत. माहिती मिळताच थाथरीचे एसडीएमक्स` यांनी आपत्तीग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी नेले. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे पथकही घटनेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी पोहोचले आहे.

या गावातील काही इमारतींना काही दिवसांपूर्वीच तडे जाऊ लागले होते. परंतु गुरुवारी झालेल्या भूस्खलनामुळे परिस्थिती आणखीनच बिघडली. बऱ्याच इमारतींचे नुकसान झाले असून, त्यांची संख्या २१ वर पोहोचली आहे. दोडापासून ३५ किलोमीटरवर थाथरी येथील किश्तवार-बटोटे राष्ट्रीय महामार्गालगतच्या नई बस्ती गावातील एक मशीद आणि मुलींची शाळाही प्रशासनाने असुरक्षित म्हणून जाहीर केली आहे.

डिसेंबर २०२२ मध्ये डोडा येथील एका घराला तडे गेल्याची नोंद झाली होती. २ फेब्रुवारी रोजी येथील ६ इमारतींना तडे गेले. ३ फेब्रुवारीपर्यंत डोडोच्या २१ घरांमध्ये भेगा दिसून आल्या. दोडाचे जिल्हादंडाधिकारी अथर अमीन यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील काही घरांना तडे गेल्याची नोंद आहे. गुरुवारपर्यंत आणखी सहा इमारतींना भेगा पडल्या आहेत. ते वाढत आहे. याबाबत शासनाला कळविण्यात आले आहे. या भागाला तडे जात आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number