आत्ता मिळणार म्हाडामध्ये घरे

मुंबई, १९ मे २०२३, प्रतिनिधी :  मुंबईत स्वतःच अस हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्नं असत. म्हाडाच्या मुंबई घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील ४ हजार ८३ घरांसाठी २२ मे रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाची ही घरं गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळमध्ये आहेत. तर, २२ […]

आत्ता मिळणार म्हाडामध्ये घरे

मुंबई, १९ मे २०२३, प्रतिनिधी :  मुंबईत स्वतःच अस हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्नं असत. म्हाडाच्या मुंबई घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुंबईतील ४ हजार ८३ घरांसाठी २२ मे रोजी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हाडाची ही घरं गोरेगाव पहाडी, विक्रोळीच्या कन्नमवारनगर, अँटॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर, सायन परळमध्ये आहेत. तर, २२ मे पासूनच नोंदणी, अर्ज विक्री-स्वीकृतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्याच प्रमाणे अनामत रकमेसह अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे २६ जून रोजी. १८ जुलै रोजी लोटरिची सोडत वांद्रे पश्चिम रंगशारदा सभागृह या ठिकाणी होणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची चर्चा मागील १ वर्षा पासून रंगली होती. परंतु; काही कारणांमुळे सोडतीला उशीर झाला. मुंबई मंडळातील घरांसाठी शेवटची सोडत २०१९ मध्ये काढण्यात आली होती. आता अखेर मंडळाने ४ हजार ८३ घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे आता अनेकांचे हे स्वप्न साकार होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number