जय महाराष्ट्र न्यूज, जुन्नर
शिवकालीन इतिहासाला दुजोरा देत संगमनेर असोसिएसनच्या वतीने प्रेमगिरी ते शिवनेरी किल्ला अश्वरूढ प्रवास केला.
प्रेमगढ ते शिवनेरी हे 70 किलो मिटरचे अंतर आहे. 22 घोडे स्वारांच्या पथकानं हे अंतर 2 दिवसात पुर्ण केले. या घोडे स्वारांना पाहण्यासाठी नागरीकांनी चांगलीच गर्दी
केली होती.
जुन्नर मधिल शिवनेरी या शिवरायांच्या जन्मभूमीला वंदन करून या प्रवासाचा समारोप करण्यात आला.
तरुणाईचा या अश्व रोहणाला चांगला प्रतिसाद मिळतोय. अगामी काळात संगमनेर असोसिएशन अश्वरूढ मोठ्या प्रवासांचे अयोजन करणार असल्याची माहिती संगमनेर
अश्वरोहण संघटनेचे अध्यक्ष रणजीत देशमुख यांनी दिली.