एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच

वृत्तसंस्था, मुबंई   मोबाईल कंपनी हुवाईनं Honor 9i हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला आहे. या नव्या फोनमध्ये अनेक वेगवेगळी फिचर्स देण्यात आली आहेत. याआधी हुवाईनं सप्टेंबरमध्ये मायमँग 6 चीनमध्ये लाँच केला होता. Honor 9i या स्मार्टफोनमध्ये फ्रंट आणि रियर पॅनलमध्ये दोन-दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे या फोनमध्ये एकूण चार कॅमेरे आहेत. या स्मार्टफोनमध्ये असलेला […]

एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल चार कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच

वृत्तसंस्था, मुबंई

 

मोबाईल कंपनी हुवाईनं Honor 9i हा स्मार्टफोन भारतामध्ये लाँच केला आहे. या नव्या फोनमध्ये अनेक वेगवेगळी फिचर्स देण्यात आली आहेत. याआधी हुवाईनं सप्टेंबरमध्ये मायमँग 6 चीनमध्ये लाँच केला होता.

Honor 9i या स्मार्टफोनमध्ये फ्रंट आणि रियर पॅनलमध्ये दोन-दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. त्यामुळे या फोनमध्ये एकूण चार कॅमेरे आहेत.

या स्मार्टफोनमध्ये असलेला फुलव्हिजन डिस्प्ले कॅमेरा इतर फोनपेक्षा वेगळा आहे. Honor 9i या स्मार्टफोनची किंमत 17,999 रुपये एवढी आहे. हा स्मार्टफोन सध्या ई कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टवरच उपलब्ध आहे.

14 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल.

Honor 9i चे बेस्ट फिचर्स

– 5.9 इंचांची स्क्रीन

– मेटल बॉडीचा डिस्प्ले

– 16 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे सेंसर कॅमेरे

– कॅमेरा सेटअप व्हर्टिकल आहे आणि एलईडी फ्लॅश 

– सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे फ्रंट कॅमेरे

– 4GB रॅम 

– 2.36 गिगाहर्ट्सचा ऑक्टो-कोर किरीन 659 प्रोसेसर

– इनबिल्ट स्टोरेज 64GB

– 3340 mAhएवढी बॅटरी

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number