हनी सिंगने दिली धमकी

तरुणाईला रॅपची भुरळ पाडणारा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग आजकाल बऱ्याच वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतोय. अलीकडे त्याच्या लेटेस्ट म्युझिक अल्बम हनी सिंग ३.० मुळे तो चर्चेत आहे. परंतु एकीकडे त्याचे हे म्युझिक अल्बम तर दुसरीकडे त्याचे वैयक्तिक जीवन यामुळे हनी सिंग बद्दल चर्चा रंगत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी हनी सिंग आणि त्याच्या टीमविरुद्ध इव्हेंट […]

हनी सिंगने दिली धमकी

तरुणाईला रॅपची भुरळ पाडणारा प्रसिद्ध रॅपर यो यो हनी सिंग आजकाल बऱ्याच वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकतोय. अलीकडे त्याच्या लेटेस्ट म्युझिक अल्बम हनी सिंग ३.० मुळे तो चर्चेत आहे. परंतु एकीकडे त्याचे हे म्युझिक अल्बम तर दुसरीकडे त्याचे वैयक्तिक जीवन यामुळे हनी सिंग बद्दल चर्चा रंगत असतात.
अशातच काही दिवसांपूर्वी हनी सिंग आणि त्याच्या टीमविरुद्ध इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सीच्या मालकाचे अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती.

काही]दिवसांपूर्वी हनी सिंगवर विवेक रमन नावाच्या व्यक्तीने मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.या प्रकरणाचा बराच गाजावाजा झाला. त्यानंतर अनेकांनी हनी सिंगला ट्रोल केले होते. त्यानंतर आता हनीने अखेर मौन सोडले आहे. नुकतेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्यावर करण्यात आलेल्या सर्व तक्रारी खोट्या असून त्या निराधार आहेत असा दावा केलाय. तसेच त्याच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात ठोस पावलं उचलणार असल्याचंही त्याने सांगितलं आहे. त्याची टीम कायदेशीर पद्धतीने आरोपींविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्याचा विचार करत असल्याचे त्याने स्पष्टच सांगितले.

त्यांने पोस्टमध्ये म्हटले की, “हे सर्व आरोप खोटे असून हा केवळ माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न आहे. अशा लोकांविरुद्ध मी नक्कीच मानहानीचा खटला दाखल करण्यासाठी आधीच कार्यरत आहे.” त्याच्या या पोस्टने नेटकऱ्यांच्या भुवया उंचवल्यात. आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number