Buttermilk Recpie: उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्याचा सोपा उपाय, बनवा घरच्याघरी ताक

उन्हाळ्यात सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय म्हणजे ताक. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी ताक अत्यंत फायदेशीर ठरते. ताक तयार करण्याची जाणून घ्या योग्य पद्धत.

Buttermilk Recpie: उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्याचा सोपा उपाय, बनवा घरच्याघरी ताक

Buttermilk Recpie: उन्हाळ्यात सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय म्हणजे ताक. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी ताक अत्यंत फायदेशीर ठरते. ताकाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते, आम्लपित्त कमी होते आणि शरीर हायड्रेटेड राहते. ताकात प्रोबायोटिक्स, कॅल्शियम, आणि व्हिटॅमिन B12 भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हाडे मजबूत होतात. दररोज ताक प्यायल्याने पोटाची जळजळ कमी होऊन शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. ताक कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत राहतात. ताक तयार करण्याची जाणून घ्या योग्य पद्धत.

साहित्य:

  • 1 कप दही
  • २ कप थंड पाणी
  • 1/2 चमचा काळं मीठ किंवा साधे मीठ
  • 1/2 चमचा भाजलेले जिरे पूड
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
  • पुदिन्यांची पानं
  • 1-2 बर्फाचे तुकडे
  • जलजीरा पावडर

हेही वाचा: Kairi Panha Recipe: आंबट-गोड कैरी पन्हे; उन्हाळ्यासाठी परफेक्ट पेय

कृती:

  • एका भांड्यात दही घेऊन ते रवीने घुसळून घ्या (दही मिक्सरला देखील लावू शकता)
  • त्यात थंड पाणी, मीठ, जलजीरा पावडर आणि जिरे पूड घालून पुन्हा रवीने घुसळून घ्या किंवा मिक्सरला लावा.
  • त्यात ठेचलेला पुदिना टाकून पुन्हा मिक्स करा.
  • वरून बर्फाचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून थंडगार ताक सर्व्ह करा. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number