राज्यात सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून साताऱ्यात दाखल झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवेंद्रराजे, उदयनराजे, चंद्रकांत पाटील उपस्तथित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यालसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे यांचे कौतुक केले. उदयनराजे आमच्या मंचावर आल्यामुळे आमच्यासाठी सुदिन दिवस असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राजे आमच्या मंचावर यापेक्षा सुदिन काय असू शकते असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली.
छत्रपतींचा आदेश हा मावळा पूर्ण करणारच असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
पुढच्या निवडणुकीचा निकाल लागलेलाच आहे.
महाराजांनी मागण्या नाही आदेश करावे.
आता आमच्यासमोर लढण्यासाठी पैलवानच नाही.
साताऱ्यातला कायम दुष्काळी भागल संपवणार.
साताऱ्यातील सर्व बेघरांना घरं देणार.
उदयनराजे काम घेऊन आल्यावर काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
दोन्ही राजेंनी स्वत:साठी काही मागितले नाही.
राजेंना सर्वाधिक मतांनी निवडून आणणार.
छत्रपतींचे घराणं हे घेणारं नाही देणारं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.