भारत – पाकिस्तान तणावानंतर गृहमंत्रायलाचे निर्देश; 7 मे रोजी देशव्यापी ‘मॉक ड्रिल’

केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना 7 मे रोजी युद्धसज्जतेच्या दृष्टीने ‘मॉक ड्रिल’ म्हणजेच युद्धस्थितीत नागरिकांनी आणि यंत्रणांनी कशी तयारी ठेवावी याचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत.

भारत – पाकिस्तान तणावानंतर गृहमंत्रायलाचे निर्देश; 7 मे रोजी देशव्यापी ‘मॉक ड्रिल’

नवी दिल्ली: पहलगाम येथे झालेल्या भीषण हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना 7 मे रोजी युद्धसज्जतेच्या दृष्टीने ‘मॉक ड्रिल’ म्हणजेच युद्धस्थितीत नागरिकांनी आणि यंत्रणांनी कशी तयारी ठेवावी याचा सराव करण्याचे निर्देश दिले आहेत.

माहितीनुसार, या मॉक ड्रिलमध्ये नागरिकांना हवाई हल्ल्याचा सायरन ऐकून योग्य प्रतिसाद देणे, सुरक्षित जागी स्थलांतर करणे, अंधारात राहणे (ब्लॅकआऊट), तसेच महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा यांसारख्या गोष्टींचा समावेश असणार आहे. विशेष म्हणजे, ही कवायत ही केवळ शासकीय अधिकाऱ्यांसाठीच नव्हे तर सामान्य जनतेलाही युद्धकाळात आपले संरक्षण कसे करायचे, याचे प्रशिक्षण देण्यासाठी असेल.

हेही वाचा: 'संयम बाळगा, सैन्य कारवाई हा काही उपाय नाही'; संयुक्त राष्ट्राकडून भारत आणि पाकिस्तानला सल्ला

दरम्यान, याच काळात पाकिस्तानने सायबर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तान सायबर फोर्स नावाच्या एका सोशल मीडिया हँडलने भारताच्या संरक्षण यंत्रणांशी संबंधित महत्त्वाच्या वेबसाईट्स हॅक केल्याचा दावा केला आहे. यात मिलिट्री इंजिनिअर सर्व्हिसेस आणि मनोहर पर्रीकर संरक्षण संस्थेच्या संवेदनशील डेटावर प्रवेश मिळवल्याचेही म्हटले आहे.

या हल्ल्यामुळे आर्मर्ड व्हेईकल निगम लिमिटेड या संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थेची वेबसाईट तात्काळ ऑफलाईन करण्यात आली. सुदैवाने सायबर हॅकर्सचा तो हँडल सध्या निष्क्रिय करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे युद्ध फक्त प्रत्यक्ष सीमेवरच नव्हे तर डिजिटल जगातही सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number