त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर हल्ला झाल्याचा निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावतीसह अनेक ठिकाणी आंदोलनाला गालबोट लागले आहे. त्रिपुरा येथे झालेल्या हल्ल्याविरोधात अमरावतीमध्ये मुस्लिमांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच मुस्लिम मोर्चेकऱ्यांनी दुकानांवर दगडफेकसुद्धा केली. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना शांततेचे आवाहन दिले आहे.
त्रिपुरा येथे धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याविरोधात मुस्लिमांचा अमरावती मध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. राज्यसरकारचे या परिस्थितीवर नियंत्रण आहे त्यामुळे तुम्ही हिंसाचार थांबवावा असेही गृहमंत्र्यांनी मोर्चेकारी मुस्लिम बांधवांना सांगितले आहे.
त्रिपुरा झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी शुक्रवारच्या नमाजनंतर हजारोंच्या संख्येने मुसलमान आंदोलक रस्त्यावर उतरले. अमरावतीत या आंदोलकांच्या आंदोलनाला शेवटच्या टप्प्यात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी मोर्चाच्या आडून अनेक दुकानांवर हल्ला चढवला आणि त्यातल्या ऐवजाची तोडफोड केली. आंदोलकांना नियंत्रित करायला पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.