राज्यात सध्या ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे एनसीबीच्या डीजींनी राज्याच्या डीजीपींना पत्र लिहिले आहे. या पत्रात पाच ड्रग्जचे प्रकरण एनसीबीकडे वर्ग करण्याचे गृहमंत्री अमति शाह यांनी आदेश दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानंतर एनसीबीच्या डीजींनी राज्याच्या डीजीपींना पत्र लिहिले आहे. मात्र महाविकास आघाडी ड्रगज्या हायप्रोफाईल प्रकरणांना एनसीबीकडे देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सरकार यांच्यात सामना रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून देण्यात आलेल्या पत्राबाबत मुंबई पोलीस विचार करत हेत. मात्र पत्रामध्ये ड्रग्जचे नेमके प्रकरण कोणते याची माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या गुन्ह्यांचा तपास यंत्रणेला करावा लागेल याबाबत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुले राज्य सरकार ड्रग्जचे हायप्रोफाईल प्रकरण एनसीबीकडे देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.