राज्यभरातील शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी

राज्यात वाढत्या उन्हामुळे शाळांना आज पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १५ जून पासून मुलांच्या शाळा सुरू होणार आहे. शाळांना सुट्टी मिळाल्याने लहानग्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. राज्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बहुतेच जिल्ह्यात पारा हा ४०च्या वर गेल्याने उष्मताघातासारख्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, सध्या शाळा सुरू आहेत. वाढत्या उन्हाचा मुलांना त्रास होऊ […]

राज्यभरातील शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी

राज्यात वाढत्या उन्हामुळे शाळांना आज पासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. १५ जून पासून मुलांच्या शाळा सुरू होणार आहे. शाळांना सुट्टी मिळाल्याने लहानग्यांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. राज्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बहुतेच जिल्ह्यात पारा हा ४०च्या वर गेल्याने उष्मताघातासारख्या घटना वाढल्या आहेत. दरम्यान, सध्या शाळा सुरू आहेत. वाढत्या उन्हाचा मुलांना त्रास होऊ नये यासाठी आज पासून सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

उष्णतेची तीव्रता लक्षात घेता शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शाळांना देण्याचा निर्णय घेतला आहे. सुटीच्या कालावधीत ज्या शाळांना अतिरिक्त उपक्रम राबवायचे असतील त्यांनी ते सकाळी अथवा संध्याकाळी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर नववी अथवा दहावीचे विद्यार्थी वगळता इतर वर्गातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.

राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू असल्यास त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे मे महिन्याच्या सुट्ट्या आता एप्रिलमध्येच देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. दरम्यान, विदर्भात सर्वाधिक तापमान आहे. यामुळे येथील शाळांची परीक्षा संपली असल्यास त्यांना सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहे. विदर्भात उन्हाचा कडाका लक्षात घेता ३० जून पर्यंत शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील इतर भागातील शाळा या १५ जून पासून सुरू होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number