माडपोपळी आणि आंब्याच्या झाडाची होळीची परंपरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माडपोपळी आणि आंब्याच्या झाडाची होळी घालण्याची परंपरा आहे. प्रथम जी होळी घालायची ते झाड निश्चित केले जाते. त्या होळीच्या झाडाची मानकऱ्यांकरवी पूजन केल्यानंतर मानाने होळी तोडली जाते त्यानंतर सदर होळीला ज्या ठिकाणी बसवायचे आहे ती होळी उभारण्यासाठी सर्व ग्रामस्थ ती होळी आनंदाने ढोल ताशाच्या गजरात नाचवत होली गे शिमगो असे बोलत होळीला जेथे […]

माडपोपळी आणि आंब्याच्या झाडाची होळीची परंपरा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात माडपोपळी आणि आंब्याच्या झाडाची होळी घालण्याची परंपरा आहे. प्रथम जी होळी घालायची ते झाड निश्चित केले जाते. त्या होळीच्या झाडाची मानकऱ्यांकरवी पूजन केल्यानंतर मानाने होळी तोडली जाते त्यानंतर सदर होळीला ज्या ठिकाणी बसवायचे आहे ती होळी उभारण्यासाठी सर्व ग्रामस्थ ती होळी आनंदाने ढोल ताशाच्या गजरात नाचवत होली गे शिमगो असे बोलत होळीला जेथे बसवायचे असते तेथे आणली जाते. नंतर त्या होळीच्या झाडाला आंब्याच्या झाडाच्या डहाळा आणि विविध सुरंगी, आबोली व अन्य फुलांनी होळीला सजविण्याची परंपरा आहे. त्यानंतर पांढऱ्या रंगाचे निशाण होळीच्या शेंड्यावर लावून ढोल वाजवत होळी गे म्हणत होळी उभारली जाते.

पुरोहितां-करवी पूजन केल्यानंतर सामुदायिक गाऱ्हाणे बोलल्या नंतर होळीचा उत्सव साजरा केला जातो. तळ कोकणात दीड दिवस ,दोन दिवस, पाच दिवस ,सात दिवस व पंधरा दिवस असा शिमगोत्सव उत्सव चालतो. दोन दिवसानंतर म्हणजे धुलीवंदनानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी राधा नाचविण्याबरोबर पारंपरिक खेळ परंपरेनुसार केले जातात. आजही परंपरा जपली जाते. त्यामुळे मंगळवारपासून जिल्ह्यात खऱ्या अर्थाने पुढे पंधरा दिवस शिंगोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number