सोलापुरात निलंबन आणि बदली नोटिशीची एसटी कर्मचाऱ्यांकडून होळी

राज्य शासनामध्ये एसटीचे विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आंदोलनावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाकडून निलंबनाच्या आणि बदलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याच नोटिसांची सोलापुरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी होळी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. विलिनीकरणाची मागणी […]

सोलापुरात निलंबन आणि बदली नोटिशीची एसटी कर्मचाऱ्यांकडून होळी

राज्य शासनामध्ये एसटीचे विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. गेल्या महिन्याभरापासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे आंदोलनावर ठाम असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एसटी प्रशासनाकडून निलंबनाच्या आणि बदलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्याच नोटिसांची सोलापुरमधील एसटी कर्मचाऱ्यांनी होळी केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. विलिनीकरणाची मागणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र तरिही कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीर ठाम असून आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे २२ कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

एसटी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन राज्य सरकार करत आहे. तरीही आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू झाले नाही तर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. कर्मचारी आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे राज्य सरकारने कारवाई करत सोलापूरमधील २८ एसटी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती तर २९६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये गेले महिनाभर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे जिल्ह्यातील एसटीसेवा बंद झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे नोकरदार, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जास्तीचे पैसे मोजावे लागत  आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number